Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाऋतुराज गाडकवाडचा मेहेंदी सोहळा साधेपणाने पडला पार

ऋतुराज गाडकवाडचा मेहेंदी सोहळा साधेपणाने पडला पार

पुणे (वृत्तसंस्था) : क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडच्या लग्नाच्या विधींनी सुरुवात झाली आहे. वधू-वराने आपापल्या हातावर आकर्षक मेहेंदी काढली आहे. मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी साधेपणाने हा मेहेंदी सोहळा पार पडला.

घरगुती पद्धतीने त्यांनी हा मेहेंदी कार्यक्रम केला. शिवाय दोघांनीही अगदी साध्या पद्धतीचे ड्रेस परिधान केले होते. ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवारच्या हातावर ऋतुराजच्या नावाची मेहेंदी रंगली आहे. तसेच त्यानेही उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी काढली आहे.

ऋतुराजने होणाऱ्या पत्नीबरोबर सोशल मीडियाद्वारे फोटो शेअर केला होता. तेव्हापासून ऋतुराजच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. आता त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -