Talathi Bharati Exams : तलाठी परिक्षेला गोंधळाचे ग्रहण; केंद्रांवर कोणीच नसल्यानं उमेदवारांचा संताप

Share

न्यायालयात दाखल करणार याचिका… नेमकं काय झालं?

पवई : राज्यभरात सध्या तलाठी भरती परीक्षा (Talathi Bharati Exams) सुरु आहेत. मात्र, दरवेळी या परिक्षांच्या नियोजनात काहीतरी बिघडल्याने उमेदवारांचा संताप होताना पाहायला मिळतो आहे. कधी पेपरफुटी, कधी सर्व्हर डाऊन, तर कधी केंद्रांमध्ये घोळ यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. आज पवई आयटी पार्क (Powai IT park) येथील परीक्षा केंद्रावर गोंधळाचा प्रकार घडला. उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणीही नसल्यानं उमेदवार संतापले आणि त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला.

राज्यभरात तलाठी भरती परीक्षा पार पडत असताना या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण आणि इतर गैरप्रकार समोर येत आहेत. तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटीचा आरोप असलेला मुख्य आरोपी गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत १३८ गुण प्राप्त करत पास झाला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायच झाला. तलाठी भरती परीक्षेत अशा प्रकारे उघडकीस येत असलेले गैरप्रकार पाहता या सगळ्या संदर्भात तातडीनं चौकशी समिती नेमावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात या आठवड्यात याचिका दाखल करणार आहे.

याचिकेद्वारे काय मागण्या आणि विनंत्या केल्या जाणार?

  • दहा ते पंधरा दिवसांच्या ठराविक वेळेत चौकशी समितीनं आपला अहवाल समोर ठेवावा.
  • अहवाल येईपर्यंत तलाठी भरती प्रक्रिया स्थगित करावी आणि अहवाल आल्यानंतर पुढील पावलं उचलावीत.
  • मेहनत, कष्ट करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये यामुळे तातडीने ठराविक वेळेत या सर्व प्रक्रिया राबवण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत.
  • राज्य सरकारला स्पर्धा परीक्षा घेण्यासंदर्भात ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या त्याची अंमलबजावणी पुढील परीक्षांमध्ये केली जावी.
  • एकाच शिफ्ट मधील परीक्षेच्या पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं मात्र काही शब्द पेपर फुटल्याचा संशय आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात चौकशी समितीचं गठन न्यायालयाने करावं.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

28 mins ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

1 hour ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

3 hours ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

4 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

5 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

5 hours ago