कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदान जाहीर

Share

मुंबई : राज्यातल्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा सरकारला जाब विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भारताच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ४३ टक्के वाटा हा आपल्या राज्याचा आहे.”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “बाजारात लाल कांद्याची आवक जास्त आहे. देशातल्या इतर राज्यांमध्ये उत्पादन वाढले आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळेच आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली. यामध्ये निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देत आहोत. २०० रुपयेची शिफारस होती, पण आम्ही ३०० रुपये देत आहोत.”

Recent Posts

युद्ध शांती अंतत: विश्वशांती ! (भाग-१)

निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर कुटुंबातील कलहापासून ते विश्व महायुद्धापर्यंत ही सर्व युद्ध का होतात?…

6 mins ago

Death : मृत्यू अटळ सत्य…

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे मरणाचे स्मरण असावे जन्म आणि मृत्यू सत्य, असत्य, दिवस-रात्र अमावस्या, पौर्णिमा,…

12 mins ago

आपला माणूस

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ नाते कोणतेही असो बहीण-भावाचे, प्रेयसी-प्रियकराचे, नवरा-बायकोचे, आई-मुलांचे. जर आपण या…

16 mins ago

Save water : पाणी

कथा : रमेश तांबे एप्रिल-मे महिन्यात सगळीकडेच पाणीटंचाईची भीषण समस्या असते. यावेळी जंगलातील प्राणी-पक्षी पाण्यावाचून…

22 mins ago

Colourful Stars : रंगीत तारे

कथा : प्रा. देवबा पाटील यशश्रीचे विज्ञानाचे ज्ञान बघून, परीला खूप आनंद होत होता. तीही…

26 mins ago

Poems and riddles : अद्दल घडली कविता आणि काव्यकोडी

अद्दल घडली खरंच सांगतो दोस्तांनो एकदा काय घडलं आभाळातून पावसाला मी खाली ओढून आणलं म्हटलं…

38 mins ago