Maratha Samaj : मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; ठाकरेंच्या नेत्याने पैसे देऊन पाठवले होते लोक

Share

संभाजीनगरमधून मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी बोलावली होती बैठक

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) मराठा समाजाच्या (Maratha Samaj) समन्वयकांची एक बैठक (Meeting) आयोजित करण्यात आली होती. लोकसभेतून (Loksabha) मराठा समाजाचा एक उमेदवार असावा, यासाठी ही बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीदरम्यान दोन गटांत तुफान राडा झाला. केवळ पुरुषच नाही तर महिलाही एकमेकींना भिडल्या. धक्कादायक बाब म्हणजे, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीत आले होते, असा आरोप या बैठकीतील समन्वयकांनी केला आहे.

संभाजीनगरमध्ये जळगाव रोड वरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती. या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दोन गटांत मारामारी झाल्यांतर ही बैठक तात्पुरती थांबवण्यात आली. या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे.

एकमताने उमेदवार ठरवण्यासाठी बोलावली होती बैठक

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी एक उमेदवार देण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. काकडे नावाच्या समन्वयकाने ही बैठक बोलावली होती. त्यात वेगवेगळी नावे सुचवण्यात आली. पण विकी राजे पाटील नावाच्या व्यक्तीने यातील काही नावांना विरोध केला आणि नव्या नावाला संधी द्या अशी मागणी केली. यासह या व्यक्तीने आपल्या स्वतःला उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली. येथूनचा वादाला सुरुवात झाली. बाळू औताडे नावाच्या समन्वयकाने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करत विकी पाटील यांना मारहाण केली. नंतर हा वाद वाढत गेला. या बैठकीत उमेदवार ठरला नाही मात्र राडा पहायला मिळाला.

त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या

या बैठकीला आलेल्या एका कार्यकर्त्याने घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला, ९ ऑगस्ट २०१६ पासून आम्ही सर्वजण सोबत आहोत. मूक मोर्चा निघाला तेव्हा आम्ही सर्वजण सोबत होतो. मात्र अचानकपणे ते विचारत आहेत की तुम्ही कोण आहात? आम्ही कोण आहोत, हे सांगण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही अमुक व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, हे सांगण्यासाठी आलो होतो. मात्र त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या. म्हणूनच मीही त्यांच्या अंगावर गेलो.

Recent Posts

Team India: राहुल द्रविड यांची टीम इंडियातून होऊ शकते सुट्टी…हेड कोच पदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळणार आहे. त्यानंतर…

3 mins ago

Ghatkopar Incident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर, ७४ जखमी

मुंबई: मुंबईत सोमवारी अवकाळी पाऊस अचानक अवतरला आणि त्याने रौद्र रूप दाखवले. या पावसाने अनेक…

1 hour ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक १४ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पुष्य योग गंड. चंद्र राशी…

3 hours ago

उबाठासेना पक्षप्रमुखांचा खोटारडेपणाचा कळस

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुखपत्राला एक मुलाखत दिली आहे. आता निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात प्रचाराचा एक…

6 hours ago

आता यावा वळीव…!

स्वाती पेशवे केवळ पूर आणतो तोच पाऊस नव्हे, तर उन्हाचा कलता ताण सहन करण्याची शक्ती…

6 hours ago

विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती: शिबानी जोशी ‘वैद्यकीय सेवेतून सामाजिक परिवर्तन’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन  १२ जानेवारी २००१ रोजी…

7 hours ago