Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीChhatrapati Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर!

Chhatrapati Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर!

शिवरायांच्या कारकिर्दीसह नव्या पैलूंचा उलगडा होणार

पॅरीस : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी, अप्रकाशित अशी प्राचीन बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा प्रारंभ आहे. पुण्यातील दोन संशोधकांना फ्रान्समधील ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये ही बखर सापडली आहे. त्यामुळे या बखरीतून शिवचरित्रातील अनेक नव्या पैलूंचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोडी लिपीत बखर

फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर मोडी लिपीत आहे. हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर १७४० नंतर लिहिलेली आहे. छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत नमूद करण्यात आला आहे. विशेषत: यामध्ये अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे मारले? त्यावेळी कोण कोण लोक हजर होते? याचाही तपशील या बखरीमध्ये केला आहे.

कशी सापडली बखर?

इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर हे मूळचे कोल्हापुरचे आहेत. ते कोल्हापूरमधील शुक्रवार पेठेत राहायचे मात्र नोकरीनिमित्त मागील काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. तर मनोज दानी हे मूळचे पुण्यातील असून ते सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतात. या दोघांनाही इतिहास संशोधन लेखनाची प्रचंड आवड आहे. हे दोघेही ६ महिन्यांपूर्वी फ्रान्समधील बीएनएफ येथील हस्तलिखित स्वरुपातील जुनी कागदपत्रे पाहत होते. त्यावेळी या दोघांना मोडी लिपीतील काही कागदपत्रे दिसून आली. त्यांचा अभ्यास करत असताना त्यांना छत्रपती शिवरायांची ही जुनी अप्रकाशित बखर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

९१ कलमी बखरीचा पूर्वसुरी दस्तऐवज

फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर चिमाजी आप्पांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजेच अंदाजे १७४० नंतर लिहिली गेली असावी असा अंदाज आहे. बखरीच्या शेवटी ही किताबत ‘राजश्री राघो मुकुंद’ यांची असे असा उल्लेख आहे. त्यामुळे ही बखर आतापर्यंत मिळालेल्या सर्व ९१ कलमी बखरीचा पूर्वसुरी दस्तऐवज आहे असा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे.

सापडलेल्या बखरीत ‘या’ गोष्टींचा उल्लेख

  • छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द.
  • छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ.
  •  छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाईसाहेब यांच्यातील संवाद.
  •  बोरीची काठी शिवाजी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होते आणि तिथे खांद्यावर कसा द्रव्य लाभ झाला.
  •  अफजलखानाला कसे मारले त्यावेळी कोण कोण लोक हजर होते.
  • छत्रपती संभाजी महाराज रायगडला आल्यानंतर त्यांनी तिथे असणारे सामान कशाप्रकारे ताब्यात घेतले.
  • विविध साधुसंतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटींचा संदर्भ.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -