Monday, June 17, 2024
Homeताज्या घडामोडीRamoji Film City : रामोजी फिल्म सिटीमध्ये स्टेजवरुन कोसळल्याने मोठ्या कंपनीच्या सीईओचा...

Ramoji Film City : रामोजी फिल्म सिटीमध्ये स्टेजवरुन कोसळल्याने मोठ्या कंपनीच्या सीईओचा मृत्यू

कंपनीच्या रौप्य महोत्सवावेळीच झाली मोठी दुर्घटना

हैदराबाद : हैदराबादच्या अत्यंत प्रसिद्ध अशा रामोजी फिल्म सिटीमध्ये (Ramoji Film City) एक दुर्घटना घडली आहे. व्हिस्टेक्स एशिया (Vistax Asia) या कंपनीचा या ठिकाणी रौप्य महोत्सव (Silver Jubilee) आयोजित करण्यात आला होता. मात्र, स्टेजवर कंपनीचे सीईओ (CEO) संजय शाह (Sanjay Shah) उभे असताना अचानक स्टेज कोसळला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत कंपनीचे प्रेसिडेंट राज डाटला देखील खाली कोसळले, ते सध्या गंभीर अवस्थेत जखमी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्हिस्टेक्स एशिया कंपनीने १८ आणि १९ जानेवारी रोजी रामोजी फिल्म सिटीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या मेगा सेलिब्रेशनसाठी बोलावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय देखील फिल्म सिटीमधील हॉटेलमध्ये करण्यात आली होती. ही दुर्घटना घडली तेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुमारे ७०० लोक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी एक विशिष्ट स्टेज बनवण्यात आलं होतं. हे स्टेज क्रेनच्या मदतीने २० फूट उंच उचललं होतं. यासाठी ६ मिमी जाड लोखंडी तारांचा वापर करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने यातील एक तार तुटली, आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलीस निरीक्षक ए. मनमोहन यांनी दिली.

ही तार तुटल्यामुळे स्टेजवर उभ्या असणाऱ्या व्यक्तींपैकी कंपनीचे सीईओ आणि प्रेसिडेंट दोघेही खाली कोसळले. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारांदरम्यान संजय यांचा मृत्यू झाला. राज डाटला यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगितलं आहे.

याप्रकरणी पोलिसांनी इव्हेंट मॅनेजमेंट अथॉरिटीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. संजय शाह हे या कंपनीचे फाउंडर देखील होते. त्यांनी १९९९ साली ही कंपनी सुरू केली होती. याचा वार्षिक टर्नओव्हर सध्या ३०० मिलियन डॉलर्स एवढा होतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -