तालिबान्यांकडून अफगाणी महिलांना क्रूर शिक्षा; संयुक्त राष्ट्रांकडून जोरदार टीका

Share

तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याचा एक ऑडिओ मेसेज नुकताच व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांचा पाश्चात्य लोकशाहीविरुद्ध लढा सुरूच राहील असेही जाहीर केले आहे. ऑडिओ मेसेजमध्ये तालिबानच्या या नेत्याने व्याभिचार करणाऱ्या अफगाण महिलांना चाबकाचे फटके आणि दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा देणार असल्याचे म्हणत आहे. यामध्ये हिबतुल्ला अखुंदजादा पाश्चात्य अधिकाऱ्यांना उद्देशून “जेव्हा आम्ही त्यांना दगडाने ठेचून मारू, तेव्हा तुम्ही याला महिलांच्या हक्कांचे उल्लंघन म्हणाल. पण आम्ही लवकरच व्यभिचाराच्या शिक्षेची अंमलबजावणी करू. आम्ही महिलांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारू. आम्ही त्यांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून ठार मारू,” असे म्हणत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यापासून काही जुने फोटो सोडले तर अखुंदजादाला कोणीही सार्वजनिकरित्या पाहिले नाही. तो तालिबानचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण कंदाहारमध्ये असल्याची माहिती सतत समोर येत असते. अफगाणिस्तानचा सरकारी टीव्ही तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे. याद्वारे अखुंदजादा याचे व्हॉइस मेसेजेस प्रसारित केले जातात. अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा क्रूर सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा पुन्हा सुरू केल्या आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी तालिबानवर जोरदार टीका करत देशाच्या राज्यकर्त्यांना अशा पद्धती थांबवण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये अखुंदजादा म्हणाला की, आंतरराष्ट्रीय समुदाय ज्या महिलांच्या हक्कांसाठी वकिली करत आहे ते तालिबानच्या इस्लामिक शरियाच्या कठोर व्याख्याच्या विरोधात आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानमध्ये मध्ये संताप निर्माण झाला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी काहींनी आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानवर दबाव वाढवण्याचे आवाहन केले आहे.

 

 

 

Recent Posts

DC vs LSG: दिल्लीच्या विजयाने राजस्थान क्वालीफाय, लखनौचा १९ धावांनी पराभव…

DC vs LSG:  दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा प्लेऑफसाठीचा संघर्ष कायम…

24 mins ago

Eknath Shinde : त्यांना सावरकर नकोय, औरंगजेब हवाय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा सेनेवर डागली तोफ मुंबई : खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचे झाल्यास मी…

4 hours ago

Monsoon Update : अंदमानच्या समुद्रात मॉन्सून रविवारपर्यत धडकणार!

जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई : नैऋत्य मोसमी…

4 hours ago

Weather Update : पुढच्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी!

नागरिकांना हवामान खात्याचा सावधानतेचा इशारा मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने…

5 hours ago

Corona In Maharashtra : सावधान ! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा फैलाव

केपी २ व्हेरियंटचे पुण्यात ५१ तर ठाण्यात २० रुग्ण मुंबई : जगावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे…

6 hours ago

PM Narendra Modi : केरळने काँग्रेसला धडा शिकवला; यूपीमध्ये त्यांचं खातंही उघडणार नाही!

दिल्लीत भाजपाचे सरकार असणे हे उत्तर प्रदेशचं भाग्य नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात लखनऊ…

6 hours ago