IAS-IPS : आर्थिकदृष्ट्या वंचित तरुणांना आयएएस-आयपीएस होण्यासाठी बॉलिवूडचा ‘हा’ ‘मसिहा’ सरसावला!

Share

मुंबई : अभिनय, समाजकार्य यातून नेहमीच सामान्य जनतेसाठी कायम हक्काने उभा असणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद! सामान्य माणसाचा ‘मसिहा’ ही अनोखी पदवी सोनू सूद ला मिळाली आहे. या अभिनेत्याने कोरोना महामारीच्या काळात असंख्य लोकांना मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. असुरक्षितांना मदत देणे असो, बेघरांना कपडे आणि निवारा देणे असो किंवा जीव वाचवणार्‍या एअरलिफ्टचे सोबत आपुलकीने केलेली विचारपूस असो सोनू सूदने अथकपणे समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या अथक वचनबद्धतेमुळे त्यांना केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही त्याचा बद्दलचा आदर वाढला असून जगभरातून सोनूच्या कामाचं कायम कौतुक झालं आहे.

सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) चे संस्थापक म्हणून सोनू सूद याने कायम समाजासाठी असंख्य काम केली. समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि नवीन बदल घडवून आणण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केलं आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि आपत्ती निवारणावर या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करून SCF च्या माध्यमातून सोनू ने लोकांचं जीवन बदललं आहे.

सूद चॅरिटी फाऊंडेशनने डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA) आणि सरत चंद्र अकादमी यांच्या सहकार्याने 2023-24 या वर्षासाठी ‘संभवम’ सुरू करण्याची घोषणा सोनू ने केली आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या सगळ्या तरुणाईला समर्पित असणार आहे ज्यांना नागरी सेवा परीक्षांचे विनामूल्य ऑनलाइन IAS कोचिंग, मार्गदर्शन मिळणार आहे.

सोनू च्या या अनोख्या कार्याने जगभरात अनेक तरुण IAS अधिकारी घडणार आहेत. SAMBHAVAM चे उद्दिष्ट हेच आहे की समाजातल्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींसाठी नव्या संधी निर्माण करणे आहे. DIYA आणि सरत चंद्र अकादमीसोबत भागीदारी करून, SCF एक चांगला आणि मजबूत भारत निर्माण नक्कीच करतील यात शंका नाही!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

1 hour ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

2 hours ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

2 hours ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

3 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

5 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

6 hours ago