‘ब्लॅक मंडे’ : कोरोनाचा तडाख्याने बाजार कोसळला!

Share

मुंबई : भांडवली बाजाराला आज पुन्हा एकदा कोरोनाचा तडाखा बसल्याचे दिसून आले. ओमायक्रॉनचा फैलाव आणि पुन्हा लॉकडाऊनचे संकट याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केली. या धामधुमीत सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०० अंकांनी आपटला. या पडझडीने काही मिनिटांत तीन लाख कोटींचा चुराडा झाला. सकाळ सकाळ जोरदार झटका देणारा आज दिवस गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला.

भारतासह जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढ करण्याचे धाडसी निर्णय घेतले. यामुळे द्विधा मनस्थिती झालेल्या गुंतवणूकदारांनी आज बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. युकेमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे.आज सोमवारी बाजार उघडताच चौफेर विक्री झाली. सध्या सेन्सेक्स १०२९ अंकांनी कोसळला आहे.

सेन्सेक्स ५६ हजार अंकांनी खाली घसरला असून तो ५५९८२ अंकावर आहे. निफ्टी ३११ अंकांनी कोसळला असून तो १६६७३ अंकावर ट्रेड करत आहे. याआधी शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ८८९ अंकांच्या घसरणीसह ५७०११ अंकावर स्थिरावला. निफ्टी २६३ अंकांच्या घसरणीसह १६९८५ अंकावर बंद झाला होता.

आजच्या सत्रात सेन्सेक्सवरील ३० पैकी केवळ ४ शेअर तेजीत आहेत तर २६ शेअरमध्ये घसरण झाली आहे. ज्यात इन्फोसिस, नेस्ले, डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा, एचसीएल टेक, एचयूएल, टेक महिंद्रा, एनटीपीसी, रिलायन्स, एसबीआय, एचसीएफसी बँक, बजाज फायनान्स या शेअरमध्ये मोठी पडझड झाली आहे.

निफ्टी मंचावरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात आज घसरण झाली आहे. दरम्यान, भारतीय स्पर्धा आयोगाने अॅमेझॉनचे २०१९ मध्ये फ्युचर ग्रुपशी केलेला करार रद्द केला आहे. तसेच आयोगाला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी चुकीची माहिती सादर केल्याबाबत अॅमेझॉनला २०० कोटींचा दंड ठोठावला. याचे पडसाद आज भांडवली बाजारात उमटले. आज फ्युचर समूहाचे शेअर तेजी दिसून आली. फ्युचर ग्रुपच्या काही शेअरमध्ये जवळपास २० टक्के वाढ झाली आहे.

Recent Posts

Sandeep Deshpande : …त्यानंतर संजय राऊत सामनामध्ये संपादकच काय कारकून म्हणूनही राहणार नाहीत!

संजय राऊतांच्या टीकेवर मनसेचे संदीप देशपांडे यांचे प्रत्युत्तर मुंबई : मनसेने महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा…

12 mins ago

Nashik scam : नाशिकच्या ८०० कोटींच्या घोटाळ्यात संजय राऊत आणि सुधाकर बडगुजरांचा हात!

संजय राऊतांच्या आरोपांवर शिवसेना व भाजपा नेत्यांचा पलटवार नेमकं प्रकरण काय? मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री…

53 mins ago

बोलघेवड्या अनिल देशमुखांना जयंत पाटलांनी उताणी पाडले!

शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेल्याचा केला होता अनिल देशमुखांनी खळबळजनक दावा…

1 hour ago

Manoj Jarange : दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात केलं दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे…

1 hour ago

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत! २२ वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

मध्यरात्री नेमकं काय घडलं? पुणे : पुण्यात गुन्हेगारीची (Pune Crime) समस्या अत्यंत गंभीर बनत चालली…

2 hours ago

Crime : नात्याला कलंक! मुलाचा मळलेला ड्रेस पाहून जन्मदात्रीने केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

बेदम मारहाण...कपड्यांशिवाय घराबाहेर उभं केलं आणि... नवी दिल्ली : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंक…

2 hours ago