न्यायासाठी भाजपचे प्रभाकर शिंदे जाणार हायकोर्टात

Share

मुंबई (प्रतिनिधी) : लघुवाद न्यायालयाने मुलुंड भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करतानाच या निर्णयाच्या अंमलबजावणीस चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. तर, निवडणूक अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगत प्रभाकर शिंदे आता या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

मुंबई महानगरपलिकेच्या २०१७च्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर छाननी अधिकाऱ्यांकडून उमेदवाराच्या अर्जावर स्वाक्षरी झाली नाही. या एका कारणास्तव प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. मात्र याबाबत शिंदे म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे किंवा कसे हे तपासण्याचा कुठलाही अधिकार उमेदवारास नसतो. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून निर्णय जाहीर करून राजपत्रात निवडणूक निकाल जाहीर करणे, ही राज्य निवडणूक आयोगाची व प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यात कुठलाही हस्तक्षेप उमेदवार करू शकत नाही. इतकेच नाही तर, निवडणूक जिंकल्यानंतर शिंदे यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे, असे असताना आता राजकीय आकसापोटी त्रयस्थ व्यक्तीने यासंदर्भात याचिका केली होती. असे देखील शिंदे म्हणाले आहेत. तर निवडणुकीच्या साडेचार वर्षांनंतर प्रभाकर शिंदे यांच्यावर असा अन्याय करणे, योग्य ठरणार नसल्याचं विधिज्ञांचेही मत आहे.

लघुवाद न्यायालयाच्या प्रभाग क्रमांक १०६ मुलुंड येथील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याच्या आणि त्या अनुषंगाने प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णयाच्या अंमलबजावणीस लघुवाद न्यायालयाने ४ आठवड्यांची स्थगिती दिलेली आहे. याबाबत प्रभाकर शिंदे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

Recent Posts

Air service : विदर्भ ते मराठवाडा एका तासात! लवकरच सुरु होणार विमानसेवा

कसं असणार वेळापत्रक? विदर्भ ते मराठवाडा (Vidarbha to Marathwada) प्रवास करणार्‍यांसाठी एक खुशखबर आहे. विदर्भ…

10 mins ago

Chhatrapati Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर!

शिवरायांच्या कारकिर्दीसह नव्या पैलूंचा उलगडा होणार पॅरीस : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी, अप्रकाशित…

21 mins ago

Yummo ice cream : कापलेलं बोट आढळलेल्या आईस्क्रिमप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

यम्मो कंपनीने घडल्या प्रकारावर दिली प्रतिक्रिया मुंबई : मुंबईच्या मालाडमधून (Mumbai crime) ऑनलाईन ऑर्डरप्रकरणी (Online…

55 mins ago

Pandharpur News : ज्ञानोबा-तुकोबांकडे जाणारा पालखी मार्ग खचला!

प्रशासनाच्या कामाबाबत वारकऱ्यांचा असंतोष सोलापूर : आषाढी एकादशीनिमनित्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी…

1 hour ago

Sikkim rain : सिक्कीममध्ये पावसाचे थैमान! भूस्खलनामुळे ९ लोकांचा मृत्यू

मूलभूत सुविधा देण्यासाठी सिक्कीम सरकारचे अथक प्रयत्न सुरु गंगटोक : सध्या देशभरात ठिकठिकाणी मान्सूनचे (Monsoon)…

2 hours ago

Anuskura Landslide : अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरुच; पुन्हा वाहतुकीचा खोळंबा!

रत्नागिरी : सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या…

2 hours ago