Mission 2024 : भाजपचे ‘मिशन २०२४’ सुरू

Share

नवी दिल्ली : गुजरात राज्याच्या विधानसभेसाठी निवडणूक सुरू असताना दुसरीकडे भाजपने २०२४ सालच्या लोकसभेसाठी तयारी (Mission 2024) सुरू केल्याचे दिसून येत आहे. लोकसभेची निवडणूक २०२४ मध्ये होणार असली तरी राजधानी दिल्लीत त्या दृष्टीने आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे ‘मिशन २०२४’ सुरू झाले आहे.

गुजरातमध्ये सकाळी मतदानाचे कर्तव्य पार पाडले आणि लगोलग पुढच्या दोन तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाले. एकीकडे गुजरातचे मतदान पार पडत असतानाच आणि त्याचे निकाल लागण्याआधीच भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीला दिल्लीत सुरुवात झाली, त्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने दिल्ली गाठली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुख्यालयात ही दोन दिवसांची बैठक पार पडत आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाने याचा समारोप होणार आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, प्रभारी यांचीही उपस्थिती आहे.

Tags: Mission 2024

Recent Posts

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

4 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

5 hours ago

होर्डिंग माफियांना आवर घाला!

रवींद्र तांबे दिनांक १३ मे, २०२४ रोजी सायंकाळी ४.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर पूर्वेकडील द्रुतगती…

5 hours ago

MI vs LSG: मुंबईच्या बालेकिल्यात लखनौची बाजी, १० व्या पराभवाने मुंबई नाराजी…

MI vs LSG: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध नाणेफेक जिंकत    गोलंदाजीचा निर्णय घेतला.…

6 hours ago

शरद पवार हे धर्मनिरपेक्षवादी नव्हे तर संधीसाधू नेते

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुन्हा…

8 hours ago

राममंदिर, सावरकरांना विरोध करणाऱ्यांबरोबर नकली शिवसेनेची हातमिळवणी

पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर घणाघात मुंबई : मुंबई चैत्यभूमीतून प्रेरणा घेते, हे आमचे सरकार आहे.…

8 hours ago