मिनीट्रेनच्या प्रवासी सेवेसाठी भाजप आग्रही

Share

नेरळ : नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी सेवा सुरू करावी आणि नेरळ येथून माथेरानसाठी मालवाहू सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी माथेरान भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) शिष्टमंडळाने आज रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली. तसेच भाजप आमदारांकडून कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, वैष्णव यांनी या तिन्ही मागण्यांवर रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.

२०१९ मधील मुसळधार पावसानंतर नेरळ-माथेरान रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला फटका बसला असल्याने त्याकडे रेल्वे मंत्र्यांनी लक्ष द्यावे, याबाबत माथेरानच्या नगरसेवकांचे शिष्टमंडळ बुधवारी नवी दिल्लीत पोहचले होते. भाजप राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली आमदार निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहरअध्यक्ष आकाश चौधरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

यावेळी माथेरानच्या भाजप पदाधिकारी यांनी मिनीट्रेनचे माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी किती महत्त्व आहे, हे रेल्वेमंत्री यांना पटवून दिले. त्याचवेळी मिनीट्रेन आणि माथेरानचे पर्यटन हे समीकरण असल्याने भाजपच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे नेरळ-माथेरान-नेरळ ही प्रवासी सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी रेल्वेमंत्र्यांनी संबंधित मार्गाची लवकरात लवकर सुरक्षा तपासणी पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

भविष्यात नेरळ-माथेरान दरम्यान मालवाहतुकीची ट्रेन सुरू करणे, अमन लॉज ते माथेरान दरम्यान सध्या धावणाऱ्या तीन डब्यांच्या ट्रेनऐवजी आठ डब्यांची ट्रेन सुरू करण्याबाबत पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याचे आदेशही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी भाजपचे रायगड जिल्ह्यातील युवानेते किरण ठाकरे, माथेरानचे नगरसेवक राकेश चौधरी, संदीप कदम तसेच भाजप पदाधिकारी संजय भोसले उपस्थित होते.

कर्जत-पनवेल मार्गावर शटलसेवा?

कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान शटल रेल्वे सुरू करण्यासाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शटल सेवेसाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर अडीच वर्षांपासून बंद असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सुरक्षाविषयक पाहणीही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जत-पनवेल रेल्वे मार्गावरून सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मात्र, शटल वा लोकल सेवा नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व चाकरमान्यांना प्रवासात अडचणी येत होत्या. त्याचबरोबर या भागाच्या विकासालाही मर्यादा आल्या आहेत. या प्रश्नावर आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत पाटील आणि आमदार महेश बालदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे प्रयत्न सुरू केले आहेत.

Recent Posts

मनसे नेते अविनाश जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…

48 mins ago

सरकारने हटवली कांदावरील निर्यात बंदी, बळीराजा सुखावला…

Onion Export: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कांद्याच्या निर्यात धोरणात 'निषिद्ध' वरून 'मोफत' मध्ये सुधारणा…

2 hours ago

Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर…

2 hours ago

Amitabh Bachchan : ‘बिग बी’कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल…

3 hours ago

LS Polls : महाराष्ट्रात ७ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तिस-या टप्प्यातील ११ मतदारसंघांसाठी ७ मे रोजी…

4 hours ago