Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडीदहशतवाद्यांचे भिवंडी कनेक्शन! भिवंडीत कॉलसेंटर सापडले

दहशतवाद्यांचे भिवंडी कनेक्शन! भिवंडीत कॉलसेंटर सापडले

गुजरात सायबर सेलच्या पथकाने तीन जणांना भिवंडीत पकडले

अहमदाबाद/ भिवंडी : पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करणाऱ्या ‘एसएफजे’ या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या टोळीचे भिवंडीतील कॉलसेंटर अहमदाबाद येथील सायबर सेलने उद‌्ध्वस्त केले. या ठिकाणी काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून सीम कार्डचे तब्बल चार बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. गुजरात पोलीस कारवाईची संपूर्ण माहिती शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत.

पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करणाऱ्या ‘एसएफजे’ संघटनेचे रेकॉर्ड केलेले कॉल या सेंटरच्या माध्यमातून लोकांच्या फोनवर डायव्हर्ट करण्यात येत होते. भिवंडीतील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हा गोरखधंदा सुरू होता.

गुजरात एटीएसचे पोलीस उपायुक्त अजित रजियान यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपायुक्त जी. पी. यादव यांच्यासह पथकाला तातडीने भिवंडीत रवाना केले आणि त्यांनी ही मोहीम फत्ते केली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांची भेट झाली होती. तेव्हा काही संशयास्पद कॉल रेकॉर्डिंग सायबर सेलच्या हाती लागले होते. त्याआधारे पथकाने मध्य प्रदेशातून काही आरोपींना अटक केली होती. त्यांची चौकशी सुरू असताना पुन्हा काही संशयास्पद कॉल्स सायबरच्या रडारवर आले. अधिक चौकशी केली असता त्याचे कनेक्शन भिवंडीपर्यंत पोहोचले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -