Bharti Singh: लाखांवरून हजारांमध्ये पोहोचली भारती सिंहची कमाई, काय आहे कारण?

Share

मुंबई: लोकांना पोटधरून हसवणारी कॉमेडियन भारती सिंहने (bharti singh) नुकतीच आपली फी घटल्याबद्दलचा खुलासा केला आहे. कॉमेडियनने सांगितले की आधीच्या तुलनेत तिच्या फीमध्ये आता मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने कमी फी मिळण्याबाबतचे कारण सांगितले.

कोरोनाने झाला परिणाम

भारतीय सिंहने नुकतीच फीमध्ये झालेल्या कपातीबाबद हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. भारतीने सांगितले, कोरोना काळात शोच्या बजेटवर खूप परिणाम झाला. असे प्रत्येक इंडस्ट्री आणि बिझनेसमध्ये झाले. मात्र कोणालाही हे वाटणार नाही की त्याच्या टॅलेंटला कमी फी मिळावी. आधी मी एका शोसाठी जितकी रक्कम घेत होती त्यापैकी २५ टक्केही रक्कम आता मला मिळत नाही.

अर्ध्या फीमध्ये काम नाही करणार

यासोबतच भारती म्हणाली, जर कोणी मला अर्धी रक्कम देत असेल तर मी काम करणार नाही. जर तुम्ही एखाद्या शोसाठी महिन्याचे २६ दिवस काम करायचे म्हणाल आणि रक्कम चांगली देत नसाल तर मी काम करणार नाही. मी माझ्या बाळाला १२-१२ तास एकट्याला सोडून येते. यासाठी मला माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळायलाच हवा.

लाखोंवरून हजारोंवर आली कमाई

यासोबतच भारतीने म्हटले की मी असे नाही म्हणणार की मला आधी लाखो रूपये फी मिळत होती आणि मी आता ५० हजार घेत आहे. जेव्हा मी स्टेजवर येते तेव्हा मला लक्षातही नसते की मला या शोसाठी किती रूपये फी मिळते.

भारती सिंह अनेक रिअॅलिटी शो ऐवजी द कपिल शर्मा शोमध्येही दिसली आहे. या शोजव्यतिरिक्त ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

Recent Posts

Vidhansabha Election : विधानसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रात दोन प्रभारींची नियुक्ती

केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली मोठी जबाबदारी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) राजकीय पक्षांनी…

3 hours ago

Laxman Hake : सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय उपचार घेणार नाही!

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची मागणी जालना :…

4 hours ago

West Bengal railway Accident : पश्चिम बंगाल रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला!

१५ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळच्या सुमारास रेल्वे…

4 hours ago

Murud news : मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच सिझेरयन शस्त्रक्रिया सुविधा

आदिवासी गरोदर महिलांची होणारी गैरसोय टळली मुरुड : दुर्गम ग्रामीण भागातील गरजू गरीब व आदिवासी…

5 hours ago

Nagpur Hit and run : नागपुरात मद्यधुंद तरुणांनी फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना कारने चिरडलं!

हिट अँड रन प्रकरणाने उडाली खळबळ नागपूर : राज्यभरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 'हिट…

5 hours ago

Pune Vidhansabha : पुण्याच्या जागांवरुन मविआ आघाडीत होणार बिघाडी!

ठाकरे-पवारांमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता पुणे : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi)…

5 hours ago