
मुंबई : यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून आज, गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. त्यानुसार यंदाचा मान्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात साधारण ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नैऋत्य मान्सून आज, गुरुवारी अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात आज (दि.१५) ते रविवार (दि.१८) पर्यंत मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने पुणे शहराला पुढील चार दिवस 'यलो' अलर्ट दिला असून पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यताही वर्तविली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

नाशिक : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १६ ...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण व लगतच्या भागांमध्ये हवेच्या वरच्या पट्ट्यात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व हवामानातील बदल, चक्रीय स्थिती आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे शहरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह, मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मराठवाड्याला 'यलो' अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भात पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा वगळता राज्यामधील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा दिला आहे.