Wednesday, May 14, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पाकिस्तान पाठोपाठ भारताचा तुर्की आणि चीनला दणका!

पाकिस्तान पाठोपाठ भारताचा तुर्की आणि चीनला दणका!

भारताने बंद केले तुर्की आणि चीनचे एक्स-अकाऊंट

नवी दिल्ली : भारत सरकारने आज, बुधवारी तुर्की सरकारी वाहिनी टीआरटी वर्ल्ड आणि चीनच्या सरकारी माध्यम 'ग्लोबल टाईम्स' आणि शिन्हुआचे 'एक्स' अकाउंट ब्लॉक केले. या खात्यांवरून भारतीय सैन्याबद्दल निराधार बातम्या पसरवल्या जात होत्या. ही माध्यमे पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न अशा खोट्या बातम्या देखील पसरवतात.

'ग्लोबल टाईम्स' हे चीनच्‍या सरकारचे मुखपत्र आहे. अत्‍यंत आक्रमकपणे चीनच्‍या सरकारची बाजू मांडण्‍यासाठी ते जगभरात कुख्‍यात आहेच. आता या मुखपत्राने आपल्‍या एक्स अकाउंटवरुन ब्‍लॉक करण्‍यामागे विशिष्ट कारण अधिकृतपणे पुष्टी केलेले नसले तरी ही कारवाई भारताने शत्रु राष्‍ट्रांकडून भारताच्‍या अपप्राचाराला अंकुश लावण्‍याच प्रकार आहे.

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आश्रयाखाली काम करणारे ग्लोबल टाईम्स अनेकदा भारतावर टीका करणारे आणि बीजिंगच्या भू-राजकीय भूमिकेशी जुळणारे कथा प्रकाशित करते. त्याच्या सामग्रीवर चुकीची माहिती पसरवल्याबद्दल वारंवार टीका झाली आहे, विशेषतः २०२० च्या गलवान संघर्षासारख्या वाढत्या भारत-चीन तणाव निर्माण झाला असताना ग्‍लोबल टाईम्‍सने अत्‍यंत निराधार माहिती देत भारताची बदनामी करण्‍याचा प्रयत्‍न केला होता.

Comments
Add Comment