
एका दिवसात कमावले तब्बल ७० हजार कोटी रुपये
मुंबई : भारत पाकिस्तान युद्धबंदीच्या निर्णयानंतर उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा फायदा झाला आहे. अदानींच्या १० कंपन्यांनी इतकी चांगली कामगिरी केली की त्यांनी एका दिवसात ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे.
अदानी एंटरप्रायझेसला २० हजार कोटी रुपयांचा नफा सर्वात मोठा फायदा अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला झाला आहे. ज्यामध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गौतम अदानी यांच्या सिमेंट कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही चांगली वाढ झाली आहे. वीज आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली.
अदानी समूहाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचे मार्केट कॅप १९९५५.७८ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप २५९८९२.६५ कोटी रुपयांवरून २७९८४८.४३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अदानी समूहाच्या अदानी पोर्ट अँड सेझचे मार्केट कॅप १२,०६४.३८ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप २,८२,३५१.७६ कोटी रुपयांवरून २,९४,४१६.१४ कोटी रुपयांवर पोहोचले. अदानी समूहाच्या अदानी पॉवरचे मार्केट कॅप १२,७०८.६२ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप १,९८,०५३.८१ कोटी रुपयांवरून २,१०,७६२.४३ कोटी रुपयांवर पोहोचले. अदानी समुहाच्या अदानी एनर्जी सोल्युशन्सचे मार्केट कॅप ८,०९०.६५ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप ९९,२७३.९९ कोटी रुपयांवरून १,०७,३६४.६४ कोटी रुपयांवर पोहोचले. अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जीचे मार्केट कॅप ९,८७६.४५ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप १,३९,२२०.६१ कोटी रुपयांवरून १,४९,०९७.०६ कोटी रुपयांवर पोहोचले.

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी हवाई ...
अदानी समुहाच्या अदानी टोटल गॅसचे मार्केट कॅप ३,१६१.९६ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप ६६,२७४. ५५ कोटी रुपयांवरून ६९,४३६.५१ कोटी रुपयांवर पोहोचले. अदानी ग्रुपची सिमेंट कंपनी एसीसी लिमिटेडचे मार्केट कॅप ८६१.९५ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप ३४,०४९.५८ कोटी रुपयांवरून ३४,९११.५३ कोटी रुपयांवर पोहोचले. अदानी समूहाची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटचे मार्केट कॅप ३.३३७.५४ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप १,३०,०२८.२८ कोटी रुपयांवरून १,३३,३६५.८२ कोटी रुपयांवर पोहोचले. अदानी समूहाच्या सिमेंट कंपनी सांघी इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप ६३.२९ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप १,५०५.०१ कोटी रुपयांवरून १,५६८.३० कोटी रुपयांवर पोहोचले. अदानी ग्रुपची मीडिया कंपनी एनडीटीव्हीचे मार्केट कॅप २४.८२ कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप ७५८.८३ कोटी रुपयांवरून ७८३.६५ कोटी रुपयांवर पोहोचले.