
रोहितकडे कर्णधार पदाची जबाबदारी
नवी दिल्ली : नेपाळ क्रिकेट बोर्डाने स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित पौडेल हा नेपाळचे नेतृत्व करणार आहे. तसेच या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी दीपेंद्र सिंग आयरी याच्याकडे देण्यात आली आहे. नेपाळ क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली आहे. नेपाळ टीम स्कॉटलँड दौऱ्याआधी इंग्लंडमध्ये सराव सामने खेळणार आहे. नेपाळ क्रिकेट टीम १६ ते ३१ मे दरम्यान ६ सराव सामने खेळणार आहे. तसेच नेपाळ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेत नेदरलँड्स आणि स्कॉटलंड विरुद्ध प्रत्येकी २-२ सामने खेळणार आहे. तसेच नेपाळ टीम लीग २ स्पर्धेनंतर टी-२० ट्राय सीरिजसाठी स्कॉटलँडमध्ये थांबणार आहे.
नेपाळ क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या संघात रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, कुशल भुरटेल, अनिल कुमार साह, भीम शार्की, आरिफ शेख, बसीर अहमद, गुलशन कुमार झा, दीपेंद्र सिंग आयरी, संदीप लामिछाने, सोमपाल कामी, करण केसी, ललित नारायण राजबंशी, नंदन यादव आणि रिजन ढकल यांचा समावेश आहे.