
मुंबई : पश्चिम रेल्वेवर शनिवारी (दि. १० मे) रोजी मध्यरात्री माहीम जंक्शन आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर रात्री १ ते ४.३० वाजेपर्यंत ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान, मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या डाऊन जलद मार्गांवर चालवल्या जातील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे आणि प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्याने या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत, त्यामुळे या गाड्यांना लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दुहेरी थांबा देण्यात येईल.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील एकूण ३२ ...
त्याचप्रमाणे, सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल/ चर्चगेट दरम्यान अप धीम्या मार्गावरील गाड्या खार रोड स्थानकावर दुहेरी थांबा घेतील आणि प्लॅटफॉर्म नसल्यामुळे माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाहीत. या ब्लॉकमुळे रविवार, दि. ११ रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवस ब्लॉक असणार नाही.