
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले
पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून नाचक्की होऊ लागल्याने पाकिस्तानने जम्मू - काश्मीरमध्ये हल्ले करायला सुरुवात केली, मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आणि सर्व कट धुळीस मिळवले आहेत. भारताने पाकिस्तानला जशास तसं कसं उत्तर दिलंय ते पाहूया...
?si=cjkAeAJDmm1eC6dR
काही भागात ब्लॅक आऊट
पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने परतवले आहेत. पाकिस्तानचे हल्ले भारताच्या एस ४०० सिस्टिमने परतवून लावले. भारताने पाकिस्तानला करारी जबाब दिलाय. पाकिस्तान हल्ला करणार याच्या शक्यता असल्याने जम्मू विमानतळावर ब्लॅक आऊट करण्यात आलं. इतकंच नव्हे तर काश्मीरचा काही भाग, श्रीनगर विमानतळ, राजस्तानमधील पोखरण आणि गुजरातमधील काही भागात ब्लॅक आऊट करण्यात आला आहे.
पाकिस्तानने ड्रोन, मिसाईलद्वारे जम्मू-काश्मीरमधील काही भागात हल्ले केले. मात्र भारताच्या हे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. जम्मू विद्यापीठाजवळ पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आले. काश्मीरच्या राजौरीमध्य़े धमाका झाला आहे. त्याचबरोबर श्रीनगर हायवेवरही तीन ते चार मोठे स्फोट झाले आहेत.

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार ...
इस्लामाबादवर हल्ला
भारताने पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उदध्वस्त केली. एस ४०० सिस्टिमने पाकिस्तानंची दोन जेएफ - १७ आणि एफ १६ ही लढावू विमानं पाडली. पाकिस्तानने राजस्थानमध्ये ३० पेक्षा जास्त मिसाईल डागली, मात्र भारताने ही सर्व क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरवर ड्रोन हल्ला केलाय. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिमही भारताने निष्क्रिय केलीय. जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या SWARM सिस्टिमचा हल्ला भारताने हाणून पाडलाय. भारतीय सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले आहेत. भारताने लाहोरपाठोपाठ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केलाय. भारतीय सेनेच्या या धाडसी कार्याला सॅल्यूट....