Thursday, May 8, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविडिओ

Operation Sindoor : का दिलं ऑपरेशन सिंदूर नाव?

Operation Sindoor : का दिलं ऑपरेशन सिंदूर नाव?

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. हा सूड उगवण्यासाठी दहशतवादी ठिकाणांवर तिन्ही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलंय. काय आहे ऑपरेशन सिंदूर आणि का ऑपरेशन सिंदूर नाव दिलं गेलं? जाणून घेऊयात या लेखातून...

भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली. यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. ऑपरेशन सिंदूर या शब्दामागे शौर्य प्रतीक आणि भावना यांचं महत्त्व आहे. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांना मारण्यात आलं होतं. हिंदू आहात का असं विचारून दहशतवाद्यांनी अनेकांना गोळ्या घातल्या होत्या. दहशतवाद्यांनी क्रूरतेने विवाहितांचं कुंकू पुसलं होतं. कुंकू हे महिलांचं सौभाग्यांचं प्रतीक. मात्र दशतवाद्यांनी कोणताही विचार न करता या महिलांसमोर त्यांच्या पतींना मारलं होतं. याचा हिशोब चुकवण्यासाठी, बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव सुचवलं होतं. त्याला लष्काराने मान्यता दिली होती.

?si=bEeRr-uHUmdxntvS

सिंदूर म्हणजे काय ?

सिंदूर म्हणजे मराठीमध्ये त्याला कुंकू म्हणतात. हे कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कुंकूला खूप महत्त्व आहे. विवाहितांच्या भांगामध्ये कुंकू भरलं जातं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौसेनेचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृ्त्यू झाला होता. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. दहशतवाद्यांनी नरवाल यांना मारल्यानंतर त्यांच्या पत्नीचा शोक अख्या जगाने पाहिला. यावेळी त्यांच्या भांगामध्ये भरलेलं सिंदूर अर्थात कुंकू सर्वांनी पाहिलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांचा बदला घ्या अशा भावना तमाम भारतीयांनी व्यक्त केल्या होता. त्यामुळे दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरचा संकल्प केला. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबर शहिदांचा सन्मान आणि त्यांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची मोहीम आखण्यात आली.

काय आहे 'सिंदूर'ची परंपरा पाहुयात...

हिंदू धर्मातील स्त्रिया या प्राचीन काळापासून कपाळावर 'कुंकू' लावत आहेत. हिंदू धर्मात विवाहित स्त्रीच्या आयुष्यात कुंकवाचे महत्त्व फार मोठं आहे. कुंकू हे लाल रंगाचं असतं आणि लाल रंग हा शक्तीचं प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर कुंकू हे सौभाग्याचे, प्रेमाचे आणि भरभराटीचे प्रतीक मानलं जातं. भारताने पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरनं दिलं आहे. या हल्ल्यात अनेक विवाहितांचं कुंकू पुसलं गेलं. आता त्यांना न्याय मिळाला आहे. विवाहितेचं सौभाग्य हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरअंतर्गत कडक संदेश देण्यात आलाय.

Comments
Add Comment