
मुंबई : अभिनेत्री राखी सावंतच्या "पाकिस्तान, मी तुझ्यासोबत आहे" या वादग्रस्त वक्तव्यावरून मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेचे सचिव अनीश खांडगळे यांनी राखीच्या वक्तव्याचा निषेध करत तिला देशाबाहेर हाकलण्याची मागणी केली आहे.
खांडगळे यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत सांगितले की, "पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे बोलणे हे देशद्रोह आहे, आणि अशा प्रकारचं वागणं कदापिही सहन केलं जाणार नाही." त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी सावंतला तात्काळ पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली.

नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ...
मनसेच्या या मागणीमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले असून, राखी सावंतच्या विधानावर जनतेचा संताप वाढत आहे.