
सध्या प्रचंड उन्हाळा सुरु आहे. अशातच या गरमीमध्ये रात्री झोपताना कपडे अगदी सुटसुटीत आणि त्वचेसाठी चांगलेच वापरायला हवे. काहींना गरमी सहन होत नाही. त्यामुळे कपड्यांमुळे त्वचेला त्रास होईल किंवा आराम मिळणार नाही असे कपडे झोपताना वापरूच नयेत. दिवसभर अंगावर सर्व कपडे परिधान करून या गरमीमध्ये आपण बाहेर पडतो. आणि काही महिलांना त्याचा त्रास सुद्धा होतो. मात्र रात्री झोपतां आरामदायी कपडेच परिधान करायला पाहिजेत. आता बाजारामध्ये मुलींसाठी किंवा महिलांसाठी नाईट ड्रेस किंवा त्यामध्ये बरेच पॅटर्नस पाहायला मिळतात. या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रात्री झोपताना सुटसुटीत आणि आरामदायी असणारे नाईट आऊटफिट्स...
मॅक्सी
अनेक महिलांना रात्री झोपताना मॅक्सी परिधान करायची सवय असते. कारण मॅक्सी अगदी सुटसुटीत आणि आरामदायी असते.
मॅक्सी गाऊन
तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर तुम्ही हा गाऊन परिधान करू शकता. एकदम कम्फर्टेबल असा हा गाऊन आहे.

भारतातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे केदारनाथ. केदारनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यात केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले आहे. केदारनाथ ...
शॉर्ट गाऊन
सध्या शॉर्ट गाऊनची फॅशन आहे. हा गाऊन तुम्हाला अगदीच अराम देईल.
कॉर्डसेट नाईट सूट
असा कॉर्डसेट तुम्ही घरी रात्री झोपताना किंवा बाहेर पिकनिक साठी घेऊन जाऊ शकता. शक्यतो कॉटनचा असला तर तुम्हाला आरामदायी वाटेल.
टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट
टीशर्ट आणि शॉर्ट पॅन्ट हा सर्वच मुलींचा आवडीचा आऊटफिट असावा. कारण ह्या आऊटफिटमध्ये बहुतेक मुली कम्फर्टेबल असतात.
कफ्तान पॅटर्न
नाईट ड्रेसमध्ये कफ्तान हा पॅटर्न फार लोकप्रिय आहे. दिसायला अगदी क्लासिक आहे आणि मोकळा व सुटसुटीत आहे.
प्रिंटेड कॉर्डसेट
मार्केटमध्ये नवनवीन ट्रेंडी कपडे पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात म्हणजे हा प्रिंटेड कॉर्डसेट अतिशय लोकप्रिय आहे. तुम्ही बाहेर पिकनिकसाठी, वॉकसाठी किंवा रात्री झोपताना परिधान करूनच झोपलात तरी तुम्हाला हा आऊटफिट आरामदायी वाटेल.