
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म विचारुन हत्या करण्यात आली. या अतिरेकी हल्ल्यासाठी स्थानिकांनी अतिरेक्यांना मदत केली. अतिरेक्यांच्या हल्ल्यात २५ हिंदू पर्यटक ठार झाले. याव्यतिरिक्त एक स्थानिक पर्यटकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ठार झाला.
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या 'ऑपेरेशन ऑल आऊट'ला सुरुवात, आतापर्यंत १० दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. २५ पर्यटक आणि एका ...
सुरक्षा पथकाने अतिरेक्यांच्या मदतनिसांना शोधण्यासाठी १५०० पेक्षा जास्त नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीतून अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी शोधले आहे. अतिरेक्यांना १५ जणांनी मदत केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याआधी सुरक्षा पथकाने दहा स्थानिक अतिरेक्यांची घरे उद्ध्वस्त केली. यात लष्कर - ए - तोयबाचा आदिल हुसेन ठोकर, झाकीर अहमद गनई, अमीर अहमद दार आणि आसिफ शेख, शाहिद अहमद कुट्टे, अहसान उल हक अमीर, जैश-ए-मोहम्मदचा अमीर नझीर वाणी, जमील अहमद शेर गोजरी, द रेझिस्टन्स फ्रंटचा अदनान सफी दार आणि फारूक अहमद तेडवा यांचा समावेश आहे.
Mohan Bhagwat: "आम्ही शेजाऱ्यांना इजा करत नाही, पण जर ते वाईट मार्गाकडे वळले तर..." जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य
मुंबई: अहिंसा हा भारताचा धर्म आहे, हिंदू धर्माचे ते मुख्य तत्व आहे, यावर भर देत संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी "भारत कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान ...
पोलिसांनी अतिरेकी हल्ला प्रकरणात एकूण चार रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. अतिरेकी स्थानिकांच्या सहकार्याने हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले. स्थानिकांची मदत होती त्यामुळे अतिरेकी प्रत्यक्ष हल्ला सुरू करेपर्यंत शस्त्र सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणात अतिरेक्यांच्या मदत केल्याचे सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.