Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Solapur News : विठुरायाच्या भक्तांना मोफत प्रसाद मिळणार!

Solapur News : विठुरायाच्या भक्तांना मोफत प्रसाद मिळणार!

सोलापूर : अठ्ठावीस युग विटेवर उभा असलेल्या विठुरायासाठी एक भेट व्हावी म्हणून भक्त लांबून दर्शनासाठी येतात. टाळ मृदूंगाच्या गजरात वारीसोबत न थकता भाविक पंढरपूरला दर्शनाला येतात. या विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आषाढी वारीपासून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे.

पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन व मुख दर्शन घेणाऱ्या भाविकांना विठुरायाचा मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तेथील देवस्थानाकडून भाविकांना बुंदीचा प्रसाद दिला जातो. त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीने भाविकांना मोफत प्रसाद द्यावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

Comments
Add Comment