
उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मंगळवार १ एप्रिल २०२५ पासून दारुबंदी लागू झाली आहे. या बंदीमुळे उज्जैनमध्ये दारू विकता येणार नाही किंवा सर्व्ह करता येणार नाही. संपूर्ण उज्जैन शहरातील सर्व दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉपना कायमचे टाळे ठोकण्यात आले आहे. उज्जैनमध्ये ज्या हॉटेलांना दारू सर्व्ह करण्याचा परवाना मिळाला होता त्यांना त्यांचा परवाना सरकारकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संपूर्ण उज्जैनमध्ये दारुबंदी लागू झाली आहे.
Shivraj Singh Chauhan : शिवराज सिंह चौहान भाजपाध्यक्ष होणार?
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड एप्रिलमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पदासाठी केंद्रीय ...
उज्जैनच्याच एका भागात काळभैरवाचे मंदिर आहे. या मंदिरात काळभैरवाला दारुचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे. ज्यांना दारू प्रसाद म्हणून ठेवायची असेल त्यांना इथून पुढे उज्जैन शहराच्या बाहेरून दारू खरेदी करुन प्रसाद म्हणून अर्पण करता येईल. आधी मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी दारू विक्री केंद्र सुरू केले होते. हे केंद्र आता बंद करण्यात आले आहे. पण प्रसादाच्या विधीसाठी छोटी वाटी भरुन थोडी दारू मंदिर प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्यांना एक क्वार्टर दारू प्रसाद म्हणून अर्पण करायची असेल त्यांना उज्जैन शहराच्या बाहेरून दारू खरेदी करुन प्रसाद म्हणून अर्पण करता येईल. पण प्रसादाच्या नावाखाली दारुचा काळा बाजार किंवा तस्करी होऊ नये यासाठी खबरदारी घेणार असल्याचे मध्य प्रदेश सरकारने जाहीर केले आहे.
Ghibli : सावधान! घिबलीच्या नादात संकटात सापडाल
मुंबई : सोशल मीडियाचे (Social Media) जाळे जगभरात पसरत असून विविध ॲपचे लोकांना वेड लागत आहे. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे माणूस सहज ओढला जातो. ...
दारूच्या दुकानांमुळे घरांच्या किंमती घसरत असल्याची तक्रार उज्जैनमधील नागरिकांकडून येऊ लागली होती. शिवाय महाकालाचे मंदिर आहे त्यामुळे उज्जैनमध्ये दारुबंदी लागू करण्याची भाविकांची जुनी मागणी होतीच. अखेर जनमताचा सन्मान करत मध्य प्रदेश सरकारने उज्जैनमध्ये मंगळवार १ एप्रिल २०२५ पासून दारुबंदी लागू केली आहे. दारुबंदीच्या या निर्णयाचे उज्जैनमधील नागरिकांनी स्वागत केले आहे. दारुबंदीच्या निर्णयामुळे उज्जैनमधील १७ वाईन शॉप आणि ११ बार बंद झाले आहेत.