
प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे भारतीय हवाई दलाच्या अभियंत्याची हत्या करण्यात आली. ही घटना प्रयागराजच्या एअर फोर्स स्टेशनमधील इंजिनिअर्स कॉलनीत घडली.
Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! आणखी ३ एफआयआर दाखल
मुंबई : विनोदी कलाकार कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ...
भारतीय हवाई दलाचे सिव्हिल इंजिनिअर (अभियंता) एस. एन. मिश्रा (५१) त्यांच्या इंजिनिअर्स कॉलनीतल खोलीत झोपले होते, त्यावेळी अज्ञात व्यक्तीने खोलीच्या खिडकीतून गोळी झाडली. ही गोळी थेट छातीत लागल्यामुळे एस. एन. मिश्रा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
Salman Khan : सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खानने वापरले राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ, मुसलमान धर्मगुरु भडकले
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा सिकंदर नावाचा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा २०० कोटी रुपये खर्चून केलेला चित्रपट चालावा यासाठी ...
प्रयागराज शहर विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक भारती यांच्या मार्गदर्शनात भारतीय हवाई दलाचे सिव्हिल इंजिनिअर (अभियंता) एस. एन. मिश्रा (५१) यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. या फूटेजमध्ये मारेकऱ्याच्या हालचाली दिसत आहे. पण अद्याप पोलिसांना कोणत्याही फूटेजमध्ये मारेकऱ्याचा चेहरा व्यवस्थित दिसलेला नाही. यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू करुन मारेकऱ्याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.