
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, सतीश भोसले प्रकरणांमुळे बीडमधील गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये वारंवार हिंसक घटना घडत असून, दररोज मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर आता बीडमध्ये आणखी एकाची निघृणपणे हत्या करण्यात आली (Beed Crime) आहे. एका खोलीत दोन दिवस डांबून ठेवत मारहाण करुन ट्रक ड्रायव्हरची हत्या करण्यात आली आहे. बीडमध्ये सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Crime News)

ठाणे : राज्यात वाहन परवाना मिळविण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच परवान्या शिवाय वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी काही ...
मिळालेल्या माहितीनुसार, विकास बनसोडे (२३) असे मृत तरुणाचे नाव असून मागील तीन वर्षांपासून तो आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम (Beed Crime) करत होता. मात्र क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी विकासचे प्रेम संबंध सुरू आहेत, असा संशय क्षीरसागर यांना होता. त्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर विकास दोन दिवसापूर्वी त्याच्या मित्रासह पिंपरी गावात राहण्यासाठी आला होता. यावेळी क्षीरसागर यांनी मृत तरुण विकासला त्यांच्या मुलीसह घरामागील शेतात भेटताना पाहिले होते. यामुळे आरोपीनं विकासला दोन दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण केली.
दरम्यान, ही मारहाण इतकी भयानक होती की यामध्ये विकासचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. परंतु मारहाण का व कोणत्या कारणावरुन केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. सध्या मृत तरुण विकासचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारने गांभीर्याने या प्रकरणाची दखल घेत आरोपीचा शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे. (Beed Crime)