Saturday, May 3, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

मधमाशांच्या हल्ल्यात १६ विद्यार्थी गंभीर जखमी

मधमाशांच्या हल्ल्यात १६ विद्यार्थी गंभीर जखमी

नाशिक: त्र्यंबकरोडवरील संदीप युनिव्हर्सिटीच्या आवारात मधमाशांचे पोळे अचानक वरून खाली पडल्याने मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

यामध्ये दोघांच्या डोळ्यात व कानात मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून, इतर १४ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर अशोकनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या एस. बिल्डिंग क्लॉक टॉवरजवळ मधमाशांनी हा हल्ला केला.

या घटनेत शुभम् गुंजाळ याला मधमाशांनी घेरल्याने गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये आकांक्षा पाटील, अंशी कसबे, भावेश राऊत, प्रसन्नजित वाघोळे, मोहित जाधव, संदीप शेरे व महेश बोरसे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment