Monday, May 5, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Weather Update : नागरिकांना दिलासा! उन्हाचे चटके होणार कमी

Weather Update : नागरिकांना दिलासा! उन्हाचे चटके होणार कमी

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात दिवस व रात्रीच्या तापमानात कमालीचा फरक होता. दिवसा उन्हाचे चटके व रात्री गारवा, असे वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र, मार्च महिन्याच्या प्रारंभीच पश्चिमी विक्षोभामुळे पुढील चार ते पाच दिवसांत दिवस व रात्रीच्या तापमानात १ ते ३ अंशांची घट येण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली. (Weather Update)

पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळे वायव्य भारत राजस्थान तसेच गुजरात, मध्य प्रदेशमध्ये तापमान घसरले आहे. परिणामी विदर्भात पुढील चार, पाच दिवस कमाल आणि किमान तापमानात १ ते ३ अंशाचीही घट येण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान ३४ ते ३५, तर किमान तापमान १५ ते १८ सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा उन्हाच्या चटक्यांपासून अमरावतीकरांना काही अंशी दिलासा मिळणार आहे, तर रात्रीचा गारवा व पहाटे आल्हाददायक वातावरण अनुभवता येईल. काल दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सियस, तर रात्रीचे तापमान १९.४ अंश होते. रविवारच्या तुलनेत तापमानात एक अंशाने घट आली. (Weather Update)

तापमानात घट होण्याची शक्यता

पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळे वायव्य भारत राजस्थान तसेच गुजरात, मध्य प्रदेशात तापमान घसरले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कमाल व किमान तापमान १ ते ३ अंशांनी घट येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment