
चिपळूण : शहरात अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे व चिपळूण येथे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे सध्या चिपळुणात वाढत्या धुळीच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. (Dust Pollution)

निवड झालेल्या बालकांचे प्रवेश १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई : ‘आरटीई’२५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी ...
चिपळूणमधील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. गाड्यांच्या रहदारीमुळे धुळीचे लोट घराघरात शिरत आहेत. धुळीच्या त्रासाने चिपळूणकर सध्या बेजार झाले आहेत. मार्कंडीतील प्रभात रोड व आजूबाजूचे रस्ते, व चिपळुणातील अन्य रस्त्यावर देखील धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हजारो रुपये कर आकारणाऱ्या चिपळूण नागरपरिषदेला या रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्य नसल्याने संताप व्यक्त होत आहे. लोकांनी ओरड केली की तेवढ्या पुरते यंत्रणेकडून टँकरद्वारे रस्त्यावर पाणी शिंपडल्याचे नाटक केले जात आहे. पायाभूत सोयी सुविधा पुरवताना, चिपळूण नगरपरिषद धुळीबाबत ठोस उपाययोजना करणार का?, रस्त्याचे डांबरीकरण होईपर्यंत पाणी मारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण शहरात पुलाचे काम प्रगती पथावर आहे. याठिकाणीही आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार देखील रस्त्यावर पाणी मारत नसल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. सततच्या धुळीच्या त्रासाने अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहेत. सतत घरामध्ये देखील धूळ येत असल्याने, हात लावाल तिथे धूळ अशी स्थिती चिपळूण शहरात झाली आहे. चिपळूण शहरात महानगर गॅसकडून गॅस लाईनचे काम सुरू आहे. यासाठी खोदाई करून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. (Dust Pollution)