Tuesday, May 13, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Gautami Patil : गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

Gautami Patil : गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळीने भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विधानानंतर पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. "सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन. सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या टिप्पणीचा मी निषेध करते" असं म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर आता नृत्यांगणा गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.

'कलाकार हा कलाकार असतो'. त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचं समर्थन करतो', अशी प्रतिक्रिया नृत्यांगना गौतमी पाटीलने दिली आहे. पुढे गौतमी पाटील म्हणाली की,आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत या सर्व गोष्टींना ट्रोल जरी केल तरी तू अजिबाद लक्ष देऊ नकोस. कलाकाराचं दुःख हे कलाकाराचं माहीत असतं. कोणाच नाव कोणासोबत जोडू नका. जसं तुम्ही आमच्यावर, कलाकारांवर प्रेम करता ते तसचं राहुद्या आणि कलाकाराच्या सोबत राहा तुम्ही. मलाही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं. बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली. पण माझा त्रास मलाच माहीत, लोकांना माहीत नाही.मात्र मी खचून गेली नाही. त्यामुळे प्राजक्ता ताई या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. अशीच तू पुढे जा, हसत राहा आणि खूप छान राहा" असं प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटीलने म्हटलं आहे. करत राहावी, आणि हसत राहावं, असं गौतमीनं म्हटलं आहे.

प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे" असं म्हटलं आहे. तसेच निषेध म्हणून मी महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायचं बंद करतो असंही म्हटलं. "मी माफी मागणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून, पाया पडून एक विनंती आहे की, या खून प्रकरणावरचं लक्ष तुम्ही कोणत्याही हिरो-हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माझी आणि त्यांची नीट ओळखही नाही."

Comments
Add Comment