Wednesday, May 7, 2025

विदेशमनोरंजनताज्या घडामोडी

Japan : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला

Japan : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला

जपान: जपानची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका मिहो नायाकामा हिचा टोक्योमध्ये राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिहो नायाकामा ५४ वर्षाची होती. १९८०-९० च्या दशकात जपानी सिनेसृष्टीत मिहो नायाकामा ही सुप्रसिद्ध होती. मिहो नायाकामा लव्ह लेटर या चित्रपटामुळे सगळीकडे ओळखली जाऊ लागली.

नायाकामा हिचा मृतदेह बाथटबमध्ये आढळल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या वृत्तानंतर तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

Comments
Add Comment