Wednesday, May 7, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

या हस्तांदोलनाची चर्चा तर होणारच...

या हस्तांदोलनाची चर्चा तर होणारच... मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अनाजीपंत, महाराष्ट्राचे राजकारण बिघडवणारे नेते म्हणून टीका करणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आणि संजय राऊत यांना महत्त्व देत नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो म्हणजे 'फोटो ऑफ द डे' आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि संजय राऊत यांची मुलाखत होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान हे दोन्ही नेते भेटले आणि सदिच्छा भेट झाली. त्यामुळे या 'फोटो ऑफ द डे ची' चर्चा रंगली आहे. ज्या दोन नेत्यांच्या मधून एरवी विस्तवही जात नाही असे दोन नेते म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस. ते जेव्हा एकमेकांना हसत खेळत भेटतात आणि हस्तांदोलन करतात तेव्हा चर्चा तर होणारच.
Comments
Add Comment