समर्थ कृपा - विलास खानोलकर
एका श्रावण सोमवारी कुणब्याचा बैल तुफान उन्मत होऊन एका विहिरीवर जाऊन उभा राहिला. दहा-वीस जणांनाही तो आवरेना. सकाळपासून सायंकाळपर्यंत बैल धरण्याचे अक्कलकोटामधील लोकांचे सारे प्रयत्न थकले. बैल लोकांच्या अंगावर धावून येई. अखेरीस त्या कुणब्याने श्री स्वामी समर्थांस प्रार्थना केली. त्यावर श्री स्वामी समर्थ त्या कुणब्यास म्हणाले, ‘काय रे तुझा बैल तुला धरू देत नाही?’ कुणबी म्हणाला, ‘अंगावर येतो, धरू देत नाही, मी काय करू?’ मग श्री स्वामी महाराज स्वतः उठले, बैलाजवळ जाऊन त्याचा कान धरला. शेळीसारखे आणून बैलास कुणब्याच्या स्वाधीन केला.
भावार्थ : श्री स्वामी समर्थांचे अवघे चरित्र त्यांच्या अनेक विविध लीलांमुळे अद्भुत, रम्य आणि बोधप्रदही झाले आहे. या लीला कथेत एक साधासुधा कुणबी. त्याचा उधळलेला बैल, त्याला आवरण्याचा दहा-वीस जणांनी केलेला निष्फळ प्रयत्न, अखेरीस कुणब्याचे श्री स्वामींना शरण जाणे. श्री स्वामींनी,’काय रे, तुझा बैल तुला धरू देत नाही?’ हे आशयगर्भ काढलेले उद्गार!
हे सर्व वरवर अनाकलनीय आहे. या लीलेतील मथितार्थ पाहू गेल्यास येथील कुणबी हा एक अज्ञानी प्रापंचिक साधा-भोळा जीव आहे.
कुणाच्याही प्रपंचात अनेकदा ‘मनरूपी’ बैल उधळत असतो. तरुण वय अनेकदा मुजोर मस्ती करत असते. ते तेव्हा सहसा कुणाच्याही आटोक्यात येत नाही. सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या उधळलेल्या बैलास काबूत आणण्याचे सर्वांचे प्रयत्न थकले. याचाच अर्थ तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनाची व वृत्तीची स्थिती या लीला कथेतील कुणब्यासारखी अनेकदा झालेली असते. सत्ता-संपत्ती-तारुण्यात एक प्रकारचा उन्माद उच्छादीपणा, बेफिकिरी आणि निर्ढावलेली वृत्ती असते. यातच आयुष्य सरत जाते. वृद्धावस्था येते. मग आपण कंटाळतो. थकतो, हरतो, हतबल होतो. परिस्थितीला शरण येतो. तेव्हा या हतबलतेतून परमेश्वरास विनवितो. श्री स्वामी समर्थांना त्याची अगतिकता, मानसिक असमर्थता लक्षात येते. काय रे, तुझे तुलाच, तुझे मन, वृत्ती आवरता येत नाही का? असेच जणू उपरोधाने विचारून दयाघन श्री स्वामी समर्थ त्याच्या मदतीस येतात. शरण आलेल्या जीवाच्या अशा उधळलेल्या मनाचा आणि वृत्तीसाठी हवे निरंतर श्री स्वामी स्मरण आणि त्यांचे अनन्यभावे चिंतन.
श्रावणी स्वामी चालिसा
स्वामी तुम्हीच हो समर्थ
असमर्थांना केलेत समर्थ ।। १।।
अनेकाच्या आयुष्यात आणला अर्थ
भक्तांचा कमी झाला स्वार्थ ।। २।।
काम करू लागले नि:स्वार्थ
भक्तांना प्राप्त झाला परमार्थ ।। ३।।
अर्जुनाला वाचविले पार्थ
अभिमन्यूला शिकविले पार्थ ।।४।।
अनेकांना दाखविले मार्ग
बहुतांना मिळाला सन्मार्ग ।।५।।
परावृत्त केले वाममार्ग
अनेकांना दाखविला स्वर्ग ।।६।।
दुष्मनाला दाविला नर्क
भक्ताला औषधी अर्क ।।७।।
निपुत्रिका दिले पुत्र
सुखी संसाराचे दिले सुत्र ।।८।।
अंधाला दिली दृष्टी
दाखविली हिरवी सृष्टी ।।९।।
दुष्काळात केली पर्जन्यवृष्टी
सद्गुणांवर केली पुष्पवृष्टी ।।१०।।
स्वामी तुम्हावीण जीवन व्यर्थ
आशीर्वादाने जिवंत होई मर्त्य ।।११।।
तुमचे चमत्कार सारे अगम्य
सांभाळीले भक्त ठेवून तारतम्य ।।१२।।
स्वामी समर्थ खरे प्रभू
कैलासावरील तुम्हीच शिवशंभू ।।१३।।
साक्षात तुम्हीच हो दत्त
छोटी घटना हो निमित्त ।।१४।।
तुम्हीच हो ब्रम्हा विष्णु महेश
साऱ्या देवाचे हो ईश ।।१५।।
साऱ्यात पवित्र सर्वेष
तुम्हीच ताकदवान नरेश ।।१६।।
भक्त कल्याणकारी सुरेश
भक्त पसरले देश परदेश ।।१७।।
पितांबर दिगबंर वेश
दाही दिशांचा तूच सर्वेष ।।१८।।
भिऊ नको पाठीशी मंत्र
हम गया नही जिंदा है, गायत्री मंत्र ।।१९।।
भितो कशाला हो पुढे
स्वामीच आकाशाएवढे ।।२०।।
जय जय स्वामी समर्थ
वारकऱ्याला विठोबा समर्थ ।।२१।।
वैष्णवाला विष्णु समर्थ
शैवाला शंकर समर्थ ।।२२।।
गोकुळाला श्रीकृष्ण समर्थ
दत्तभक्तामध्ये स्वामीसमर्थ ।।२३।।
साईनाथामध्ये स्वामीसमर्थ
नवनाथामध्ये स्वामीसमर्थ ।।२४।।
अन्नपूर्णा देवीसह स्वामीसमर्थ
कोल्हापूरच्या अंबाबाई स्वामीसमर्थ ।।२५।।
ब्रम्हाविष्णू महेशात स्वामीसमर्थ
श्रीगजानन महाराजात स्वामीसमर्थ ।।२६।।
प्रत्येक मठामठात स्वामीसमार्थ
संतगोरो कुंभाराच्या माठात समर्थ ।।२७।।
ज्ञानेशाच्या रेड्यात दत्तसमर्थ
देवळात प्रसन्न स्वामी समर्थ ।।२८।।
रामपंचायनात स्वामीसमर्थ
हनुमानाच्या छातीत राम समर्थ ।।२९।।
स्वामीभक्ताच्या हृदयातच समर्थ
विद्यार्थ्याच्या हृदयात समर्थ ।।३०।।
होमाहोमात दत्तगुरु समर्थ
स्वामीसप्ताहात सर्व वार समर्थ ।।३१।।
आकाशात सूर्यचंद्रतारे समर्थ
स्वामी म्हणती भक्तांनो व्हा समर्थ ।।३२।।
मानवरूपी काया दिसली भक्तास
अक्कलकोटी केला यतीरूपी ।।३३।।
पूर्ण ब्रह्म तुम्ही अवतरला खास
श्रावण महीना स्वामीसमर्थाचा खास ।।३४।।
स्वामी स्वतःच शंभू शंकर
तिसरा डोळा राक्षसा करी कंकर ।।३५।।
स्वामी वदे भक्ता उठ
सोमवारी वहा शिवामूठ ।।३६।।
मंगळवारी गणपती दुर्वामुठ
जास्वंदी लाल ओजळमुठ ।।३७।।
शंकराला आवडे बेल
पिंडीवर वहा सहस्त्र बेल ।।३८।।
बुधवार बृहस्पती बुधपूजन
जीवनात व्हाल राणी राजन।।३९।।
गुरुवारी विनायकी चतुर्थी
स्वामी पूजा करूनी आरती ।।४०।।
स्वामी चालीसा विलास म्हणे
स्वामी स्वीकारावी अधिक उणे।।४१।।
[email protected]