
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात पुढे जायचे असते. जीवनाच्या वाटेवर आपल्याला असे लोक भेटतात जे आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. असे लोक आपली एकाग्रता भंग करण्याचे काम करतात. यामुळे काम उशिराने होते. अशा लोकांपासून दूर राहिलेलेच बरे. जीवनात पुढे जायचे असेल तर अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
सगळ्यात आधी अशा लोकांना ओळखा जे तुमच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत. जे लोक बडबड करतात, प्रत्येक कामात दखलअंदाजी देतात तसेच नकारात्मक टीका करतात.
जर तुम्हाला सातत्याने कोणी त्रास देत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा की त्यांची वागणूक तुम्हाला त्रासदायक ठरत आहे ते. शांत आणि विनम्र राहा.
जे लोक नेहमी दु:खी राहतात. त्यांच्यापासून दूर राहा. अशा लोकांना जीवनात ना स्वत:ला खुश राहता येत ना इतरांना खुश ठेवता येत.
मतलबी तसेच लालची लोकांपासून स्वत:ला जितके दूर ठेवता येईल तितके ठेवा. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. हे लोक नात्याचा वापर करतात.
ज्या व्यक्तीच्या मनात छळ-कपटाची भावना असेल अशा लोकांपासून दूर राहिलेले नेहमीच चांगले.