सुजाण पालकत्व
पालक सुजाण
बालक अजाण
सुजाण पालकत्वाची असावी प्रत्येकाला जाण
वाईट सवयी संगतीचा करा तिटकारा निर्माण
मनावर बिंबवा चांगली ध्येय
वाढवा खेळातील सहभाग
कणखर शरीर
कर्तव्यपालन
वेळेची शिस्त
संस्कारक्षम जीवनात
जिद्द आणि महत्त्वाकांक्षा करा निर्माण
मोहमायेपासून ठेवा दूर
हटवा निराशेचा धूर
निकोप वाढ, चांगले संस्कार हीच सुजाण पालकत्वाची खूण
देऊन सुसंवाद, स्वच्छता, स्वावलंबन, सुरक्षिततेचे ज्ञान
व वेळीच प्रोत्साहन वाढवा
आत्मसन्मान आणि देशाचा अभिमान.
- सुरक्षा घोसाळकर, पवई
पाणी
ऊन वाढलं मरणाचं
पाणी आटलं धरणाचं
रूप कसं रख रख झालं
पाण्यावाचून जंगलाचं
चारा नाही वारा नाही
सावलीचा थारा नाही
जीवन असं धोक्यात आलं
जंगलातल्या प्राण्यांचं
वाली रुसला वरुणदेव
अवर्षणाचं नेहमी भेव
जंगल जीवन ठप्प ठप्प
सुतक जणू मरणाचं
पाणी घटलं पाणी आटलं
जीवन मिटलं प्राण्यांचं
ऊन वाढलं मरणाचं
पाणी आटलं धरणाचं
- भानुदास धोत्रे, परभणी