
मुंबई: पपई आणि डाळिंब ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पपईमध्ये फायबर, व्हिटामिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. डाळिंबामध्येही व्हिटामिन सी सह अनेक पोषकतत्वे असतात जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. आता सवाल असा आहे की दोन्ही एकत्र खाऊ शकतो का?
पपई आणि डाळिंब एकत्र खाऊ शकतो का?
पपई आणि डाळिंब एकत्र खाल्ल्याने शरीरास खूप फायदे मिळतात. सोबतच यामुळे अनेक आजारांपासून रोखता येते. ही दोन्ही फळे अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर रोखतात. सोबतच रक्तातील पेशी वाढवतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. अॅनिमियासारख्या आजारांपासून बचाव करतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोबतच बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाची समस्या दूर होते.
पपई आणि डाळिंब दोन्ही फळे शरीरात मल्टिव्हिटामिनप्रमाणे काम करतात. पपईमध्ये व्हिटामिन ए, बी, सी असते. तर डाळिंबामध्ये व्हिटामिन सी, ई, थियामिन, रायबोफ्लेविन आणि नियासिनने भरपूर असते. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीनने भरलेली तत्वे असतात. तर डाळिंबामध्ये एलेगिटॅनिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे खाल्ल्याने शरीराची सूज कमी होते.