
मुंबई: मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यानंतर त्यांना एमर्जन्सी वॉर्डमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. आता अभिनेत्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
अभिनेते मिथुन यांना सोमवारी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर या अभिनेत्यांनी स्वत: कन्फर्म केले की ते आता ठीक आहेत आणि लवकरच काम सुरू करतील. खरंतर आता काहीच त्रास नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्यापिण्यावर कंट्रोल करावा लागेल. मी लवकरच काम सुरू करेन. कदाचित उद्यापासून असे मिथुन म्हणाले.
लोकांनी दिला डाएटची काळजी घेण्याचा सल्ला
मिथुन चक्रवर्ती यांना लोकांनी आपल्या डाएटबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला. मिथुन यांनी सांगितले की ते राक्षसाप्रमाणे खातात. यांचीच त्यांना शिक्षा मिळाली. सर्वांना माझा सल्ला आहे की आपल्या खाण्यावर कंट्रोल ठेवा. आपल्या डाएटवर नियंत्रण ठेवावे.
पंतप्रधान मोदींनी फटकारले
मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले की रुग्णालयात दाखल करताना त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. पंतप्रधान मोदींनी त्यांना आपल्या तब्येतीची काळजी न घेतल्याबद्दल फटकारले.