Wednesday, May 7, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२४

पंचांग

आज मिती पौष कृष्ण एकादशी शके १९४५. चंद्र नक्षत्र ज्येष्ठानंतर मूळ. योग व्याघात नंतर हर्षण. चंद्र राशी वृश्चिकानंतर धनू, भारतीय सौर १७ माघ शके १९४५. मंगळवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.११, मुंबईचा चंद्रोदय ०४.४५ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रास्त ०२.४३, राहू काळ ०३.४३ ते ०५.०८. षटतीला एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष - मालमत्ता, जमीन-जुमला याविषयीचे व्यवहार फायदेशीर ठरतील.
वृषभ - अचानक दूरच्या प्रवासाचे नियोजन करावे लागेल.
मिथुन - कुटुंबात एखादे कार्य ठरू शकते. जोडीदाराशी संबंध सुधारतील.
कर्क - वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
सिंह - वैयक्तिक भाग्योदय होण्याची शक्यता. पर्यटन प्रवासातून आनंद मिळेल.
कन्या - व्यवसाय-धंद्यात प्रगतिकारक घटना घडतील.
तूळ - जीवन साथीबरोबर काही कारणांनी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - आर्थिक आवक चांगली राहील.
धनू - नोकरीविषयक समस्या संपुष्टात येतील. आर्थिक बाब चांगली राहील.
मकर -: किरकोळ कारणांवरून वाद-विवाद होण्याची शक्यता.
कुंभ - सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे.
मीन - नोकरीत, व्यवसाय-धंद्यात मनासारख्या घटना घडू शकतात.
Comments
Add Comment