
वामिकाला मिळणार भाऊ की बहीण? 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे नेटकर्यांच्या चर्चेला उधाण...
बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आपल्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पॅपराझींनी (Paparazzi) या जोडप्याला एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर (Maternity clinic) स्पॉट केलं होतं. तेव्हा फोटो क्लिक न करण्याची विनंती करत आम्ही लवकरच याबाबत घोषणा करु असं दोघंही म्हणाले होते. तेव्हापासून या चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच आता बंगळुरु (Banglore) येथे हे जोडपं पुन्हा स्पॉट झालं आणि याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात अनुष्काचं बेबी बंप (Baby Bump) दिसत आहे, अशा प्रतिक्रिया नेटकर्यांकडून येत आहेत.
अनुष्का शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media viral) वाऱ्यासारखा पसरला आहे. व्हिडीओत अनुष्का आणि विराट यांच्या आसपास सिक्युरीटी गार्ड दिसत आहेत. दोघंही एकमेकांचे हात पकडून चालतायत. अनुष्काने बलून स्लीव्हसह काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. पोटावर हात ठेवून अनुष्काने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न केला आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
View this post on Instagram
'लवकरच ज्युनिअर विराट येणार', 'अनुष्का प्रेग्नंट आहे का?' अशा कमेंट्स या व्हिडीओखाली येत आहेत. तर काहींनी मात्र विरोधी भूमिका घेतली आहे. 'अनुष्का आणि विराटचं ते खाजगी आयुष्य आहे, त्यांना एकटं राहू द्या', 'एखाद्याच्या गरोदरपणाचा एवढा का बाऊ करायचा?', अशा कमेंट्सही नेटकरी करत आहेत.
विराट आणि अनुष्काने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. २०२१ मध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'वामिका' आहे. अनुष्का ही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असते, तर विराटचा नुकताच बर्थडे झाला असून या दिवशी त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. यानंतर आता हे दोघं पुन्हा काही गोड बातमी देणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विरुष्काने मात्र याबाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही.