Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

मुख्यमंत्र्यांनी तातडीने केली एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना अचानक हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याची बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सची (Air Ambulance) व्यवस्था केली आहे.

दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखत होते. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली.

Comments
Add Comment