
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा(anushka sharma) सध्या आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीबाबतच्या अफवेमुळे खूपच चर्चेत आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की अभिनेत्री मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर दिसली होती. दरम्यान, या सर्व अफवांवर अद्याप अनुष्का शर्मा अथवा तिचे पती विराट कोहलीची कोणतीहा प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यातच अनु्ष्काने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे जी तिच्या प्रेग्नंसीबाबतच्या अफवेच्या दिशेने इशारा करत असल्याचे बोलले जात आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई बनणार हे. मात्र गेल्यावेळेप्रमाणेच यावेळेसही ते सर्वात शेवटची ही बातमी सगळ्यांसोबत शेअर करतील. आता अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर कोटेशन पोस्ट लिहिली आहे.
पापाराझीला केली होती रिक्वेस्ट
गेल्या काही दिवसांपासून बातमी येत आहे की अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा आई-बाबा बनत आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट मॅटर्निटी क्लिनिकबाहेर दिसले होते आणि पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. अशातच विराट आणि अनुष्काने पापाराझीला फोटो लीक न करण्याची रिक्वेस्ट केली होती. जोडप्याने म्हटले होते की ते लवकरच ही खुशखबर आपल्या चाहत्यांशी शेअर करतील.