
मुंबई: अभिनेत्री स्वरा भास्करच्या(swara bhaskar) घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. काही महिन्यांआधी स्वरा फहद अहमदसोबत लग्न करून चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर प्रेग्नंसी रिव्हील करत चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले होते. आता फायनली त्यांच्या घरी छोट्या पाहुणीचे आगमन झाले आहे.
स्वरा भास्करने छोट्याशा परीला जन्म दिला आहे. स्वराने फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. यात आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
२३ सप्टेंबरला दिला मुलीला जन्म
स्वरा भास्करने २३ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला होता. दोन दिवसांनी ही गुडन्यूज त्याने सगळ्यांसोबत शेअर केली होती.
View this post on Instagram
छोट्या परीचे नाव ठेवले राबिया
छोट्या परीसोबत पहिला फोटो शेअर केल्यानंतर स्वरा आणि फहदने मुलीच्या नावाचाही खुलासा केला आहे. स्वराने मुलीचे नाव राबिया ठेवले आहे. या वर्षी मार्चमध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केल्यानंतर धुमधामीने रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले होते. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली होती.