Saturday, May 10, 2025

देशमहत्वाची बातमी

Chandrayaan-3: लँडर आणि रोव्हरकडून नाही मिळाला सिग्नल, संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू

Chandrayaan-3: लँडर आणि रोव्हरकडून नाही मिळाला सिग्नल, संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू

नवी दिल्ली : चांद्रयान ३(chandrayaan 3) मोहिमेतील विक्रम लँडर(vikram lander) आणि प्रज्ञान रोव्हरला(pragyaan rover) स्लीप मोडमधून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. इस्त्रोने शुक्रवारी २२ सप्टेंबरला सांगितले की लँडर तसेच रोव्हरकडून सिग्नल मिळत नाही आहे.

इस्त्रोने एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. तसेच विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, सध्या त्यांच्याकडून कोणताच सिग्नल मिळत नाही आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू राहतील.

 

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करत रचला होता इतिहास

२३ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान ३ने विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगसह भारताने इतिहास रचला होता. भारत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश होता तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला होता.

चंद्रावर झाली आहे सकाळ

चांद्रयान ३वर स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे निर्देशक नीलेश देसाईंनी दिलेल्या माहितीनुसार आता लँडर आणि रोव्हरला शनिवारी अॅक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. चंद्रावर सकाळ झालेली आहे. याआधी आमचा प्लान होता की २२ सप्टेंबरला संध्याकाळपर्यंत प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर यांना पुन्हा सक्रिय केले जाईल. मात्र काही कारणामुळे हे शक्य झाले नाही.

केंद्रीय विज्ञान मंत्र्यांनी लोकसभेत दिली ही माहिती

त्यांनी सांगितले की आम्ही २३ सप्टेंबरला उद्या पुन्हा प्रयत्न करणार. याआधी गुरूवारी इस्त्रोने म्हटले होते की लँडर आणि रोव्हर १६ दिवसांसाठी स्लीप मोडमध्ये आहे आणि दोन्ही शुक्रवारी सक्रिय केले जातील.

Comments
Add Comment