Monday, May 5, 2025

देशमहत्वाची बातमी

संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात

नवी दिल्ली : नव्या संसद भवनात पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात सोमवारपासून होत आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी रविवारी सकाळी नव्या भवनात राष्ट्रध्वज फडकावला.

सोमवारपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज राज्यसभत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवास, मिळालेले यश, अनुभव, आठवणी आणि शिकलेल्या गोष्टींवर चर्चा होईल.

राज्यसभेत पोस्ट ऑफिस विधेयक २०२३ आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्ताच्या निवडीबाबत विधेयक सादर केले जाईल. ही दोन्ही विधेयके राज्यसभेत सादर केल्यानंतर लोकसभेत ठेवली जाणार आहेत. लोकसभेत वकील अमेंडमेंट विधेयक २०२३ आणि प्रेस तसे रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स विधेयक २०२३ सादर केले जाईल. हे विधेयक ३ ऑगस्टला राज्यसभेत मंजूर झाले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज जुन्या संसदेत होईल. यानंतर १९ सप्टेंबरला नव्या संसदेत कामकाज सुरू होईल. नव्या संसज भवनात जानात संसदेचे कर्मचारी नेहरू जॅकेट आणि खाकी रंगाची पँट घातली.

५ दिवसांच्या अधिवेशना ८ विधेयकांवर होणार चर्चा

विशेष अधिवेशनाचे पहिले ससंदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, अधिवेशनादरम्यान एकूण ८ विधेयकांवर चर्चा केली जाणार आहे. रविवारी एक सवपक्षीय बैठकीत सदनाच्या नेत्यांना सूचित करण्यात आले की वरिष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक विधेयक आणि sc/st आदेशशी संबधित तीन विधेयके अजेंड्यावर ठेवण्यात आली आहेत.

Comments
Add Comment