
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिग कर्नल आणि एक मेजर शहीद झाले आहेत. हे अधिकारी 19RR ची कमान सांभाळत होते. भारतीय लष्कराने याला दुजोरा दिला आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीरचे पोलीस डीएसपीही शहीद झाले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांशी चकमकीत कर्नल मनप्रीत सिंह आणि मेजर आशिष धौनेक शहीद झाले आहेत. तर डीएसपी हुमायू भट शहीद झाले आहेत.
दहशतवाद्यांनी गोळीबार केला
ही चकमक अनंतनागच्या गुडूल गावात झाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त टीमला या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी विशेष घेराबंदी तसेच तपास अभियान सुरू केले होते. त्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या प्रारंभित गोळीबारीत ३ सुरक्षा अधिकारी गंभीररित्या जखमी झाले. यात दोन एक कर्नल आणि एक मेजर अधिकारी आहेत तर एक जम्मू-काश्मीरचे पोलीस डीएसपी आहेत.
अचानक सुरक्षा दलांवर केला हल्ला
जेव्हा यांना रुग्णालयात नेले जात होते त्याचवेळेस त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार या भागात दोन ते तीन दहशतवादी होते त्यांनी गोळीबार केला होता.