
नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (isro) चांद्रयान ३च्या (chandrayaan 3) विक्रम लँडरचे थ्रीडी फोटो शेअर केले आहेत. सोबतच असे म्हटले की हे पाहण्याची खरी मजा थ्रीडी चश्म्याने पाहण्याची आहे. ते ही रेड आणि सयान ३डी ग्लासन. खरंतर हे फोटो प्रज्ञान रोव्हरने काही दिवसांपासून लँडरपासून १५ मीटर दूर म्हणजेच ४० फूट दूर असताना क्लिक केले होते.
इस्त्रोने विक्रम लँडरच्या जवळपासचे डायमेंशनला स्टिरिओ आणि मल्टी व्ह्यू इमेज म्हणून जारी केले होते. याला इस्त्रो एनगलिफ म्हणतात. हा फोटो प्रज्ञाान रोव्हरच्या नॅव्हकॅमने घेतला होता. यानंतर नॅवकॅम स्टिरिओमध्ये मोठा बदल करण्यात आला होता.
Chandrayaan-3 Mission:
Anaglyph is a simple visualization of the object or terrain in three dimensions from stereo or multi-view images. The Anaglyph presented here is created using NavCam Stereo Images, which consist of both a left and right image captured onboard the Pragyan… pic.twitter.com/T8ksnvrovA — ISRO (@isro) September 5, 2023
हा ३ चॅनेलचा फोटो आहे. हे दोन फोटोंचे मिश्रण आहे. एक फोटो रेड चॅनेलवर होते. दुसरी ब्लू आणि ग्रीन चॅनेलवर होती. दोन्हींना मिळून हा फोटो बनून समोर आला आहे. या कारणामुळे पाहणाऱ्याला विक्रम लँडर थ्रीडीमध्ये दिसेल.
कसा आहे रोव्हरचा आकार?
चांद्रयान ३च्या रोव्हरचे एकूण वजन २६ किलो आहे. हे तीन फूट लांब, २.५ फूट रूंद आणि २.८ फूट उंच आहे. हा सहा पायांवर चालतो. कमीत कमी ५०० मीटर म्हणजेच १६०० फूटांपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊ शकतो. याचा स्पीड १ सेंटीमीटर प्रति सेकंद इतका आहे. जोपर्यंत याला सूर्याचा प्रकाश मिळत राहील तोपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर काम करेल.