
मुंबई: इंडिया आघाडीने (india alliance) मुंबईत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीबाबतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बैठक आज ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला (गुरुवार आणि शुक्रवार) मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत आहे. बुधवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीत सामील असलेले राजकीय पक्षाचे नेते मुंबईत पोहोचतील. संध्याकाळी ६ ते साडेसहा वाजता पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर साडेसहा वाजता सर्व नेता अनौपचारिक बैठक करतील. ३१ ऑगस्टला रात्री आठ वाजता डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.
जाहीर होणार आघाडीचा लोगो
इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी म्हणजेच १ सप्टेंबरला होणार आहे. याआधी १.१५ वाजता आघाडीचे नेते ग्रुप फोटो सेशन करतील. यानंतर बैठक सुरू होईल. ही बैठक दोन वाजेपर्यंत सुरू राहील. बैठक सुरू होण्याआधी आघाडीचा लोगो जाहीर केला जाईल.
बैठकीत पोहोचणार ५ मुख्यमंत्री, ८० नेते
इंडिया आघाडीच्या या मुंबई बैठकीत ५ राज्यांचे मुख्यमंत्री आणि २६ पक्षांचे साधारण ८० नेते पोहोचण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी पोहोचण्याची शक्यता आहे.