
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील माजी आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अमळनेर तालुक्यातील दहीवद गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गुलाबराव पाटील हे पुलोद सरकारच्या काळात १९७८ मध्ये पहिल्यांदा अमळनेर मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. तीन वेळा आमदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती.